ऐश्वर्यामुळे मिळाला अभिषेकला भन्साळींचा नवीन सिनेमा?
अभिनेता अभिषेक बच्चन बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सिनेमात दिसणार आहे.
मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सिनेमात दिसणार आहे.
संजय लीला भन्साळी निर्मित एका आगामी सिनेमातून अभिषेक पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय. या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित रॉय करणार आहे.
हा सिनेमा एका प्रेमकहाणीवर आधारित असेल. एक महिला आणि एका प्रोफेसरची ही प्रेमकथा असल्याचं सांगितलं जातंय. या सिनेमात अभिषेक प्रोफेसरच्या भूमिकेत दिसेल.
परंतु, चर्चा अशीही रंगतेय की हा सिनेमा अभिषेकला त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या आणि भन्साळी यांच्यातील चांगल्या संबंधांमुळे मिळालाय. ऐश्वर्या सध्या भन्साळी यांच्या 'पद्मावती' या सिनेमाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. भन्साळी आणि ऐश्वर्या यांनी देवदास, हम दिल दे चुके सनम, गुजारिश या सिनेमांसाठी एकत्र काम केलंय.
अभिषेक लवकरच प्रभुदेवाच्या 'लेफ्टी', रजत रवैलच्या 'बच्चन सिंह' तसंच रोनी स्कू्वाला आणि निशिकांत यांच्या स्वतंत्र सिनेमात दिसणार आहे.