नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता ओम पुरी यांनी देशासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या सैन्य आणि शहीदांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलंय.


शहिदांचा अपमान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका चॅनलवर सुरू असलेल्या चर्चात्मक कार्यक्रमादरम्यान ओम पुरी यांनी वायफळ बडबड केली. उरी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांबद्दल बोलताना 'आम्ही त्यांना सांगितलेलं का सैन्यात भरती व्हायला?' असं निर्लज्जपणे त्यांनी म्हटलं. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर '15-20 लोकांना तयार करा जे शरीरावर बॉम्ब बांधून पाकिस्तानात जातील आणि तिथं बॉम्बस्फोट करतील' असंही त्यांनी म्हटलं.


पाकिस्तानचा पुळका...


'भारत आणि पाकिस्तानला इज्राईल आणि फिलिस्तान बनवू नका... आपल्या देशातले अनेक लोकांची कुटुंब पाकिस्तानात आणि तिथल्या लोकांचे कुटुंब भारतात राहतात. अशात युद्धाची भाषा करण्यापेक्षा शांतता प्रस्थापित करण्याचे मार्ग शोधायला हवेत' असंही त्यांनी म्हटलंय.


पाक कलाकारांवर घातलेल्या बंदीबद्दल...


पाकिस्तानी कलाकारांना घातलेल्या बंदीबद्दल बोलताना त्यांनी सरकारवरही काही प्रश्न उपस्थित केले. 'प्रश्न विचारणारे सरकारला का प्रश्न विचारत नाहीत... की त्यांनी या पाकिस्तानी कलाकारांना कसा काय व्हिजा दिला? कलाकार फार लहान असतात म्हणून त्यांना प्रश्न विचारले जातात'