मुंबई : 'बिग बॉस १०' मध्ये आता हळू-हळू रंग चढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी ओम स्वामी आणि मोनालिसा एका स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतांना दिसले होते. त्याच्या पुढच्या दिवशी मोनालिसाने नॉन-सेलिब्रिटी कंटेस्टेन्ट मनवीरला सगळ्यांसमोर किस केलं होतं. त्यानंतर जेव्हा मोनालिसाने मनवीरला म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करते तेव्हा ते ऐकूण तर सगळेच चक्कीत झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसमध्ये सगळ्यांना एक टास्क देण्यात आला होता. ज्यामध्ये ओम स्वामी होते राजा आणि इतर सामान्य भारतीय त्याचे नातेवाईक बनले तर सेलिब्रिटीजना त्यांचे सेवक बनावे लागले. म्हणजेच मोनालिसाला त्यांची सेविका बनावे लागले. त्यानंतर बिग बॉसने म्हटलं की जर कोणत्याही एका सेलिब्रिटीने एक सिक्रेट टास्क पूर्ण केलं तर घरात सत्ता परिवर्तन होऊ शकते.


मोनालिसाला मनवीरच्या गालावर किस करण्याचा सिक्रेट टास्क आला आणि तिने ते केलं. पण जी गोष्ट टास्कमध्ये नव्हती ती देखील तिने केली ते म्हणजे ती बोलून गेली की तिचं मनवीरवर प्रेम आहे.


तर या सीजनमध्ये मनवीर आणि मोनालिसाची प्रेम कहाणी चर्चेत येतांना दिसत आहे. पण यानंतर मोनालिसा चर्चेत आली जेव्हा तिने म्हटलं की ती प्रेग्नेंट आहे. बिग बॉसच्या घरात तिने हे ओरडून ओरडून सांगितलं आणि सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. ओम स्वामींना तिने ही गोष्ट सांगितली पण तो एक मस्करीचा भाग होता हे नंतर स्पष्ट झालं.