इम्रानसोबत काम करण्यास ऐश्वर्याचा नकार
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने इम्रान हाश्मीसोबत सिनेमात काम करण्यास नकार दिल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये रंगतेय.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने इम्रान हाश्मीसोबत सिनेमात काम करण्यास नकार दिल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये रंगतेय.
मिलन लुथ्राच्या आगामी सिनेमासाठी ऐश्वर्याला विचारण्यात आल्याचं म्हटलं जातंय. मात्र, या सिनेमात इम्रान हाश्मीसोबत जास्त सीन्स असल्यानं ऐश्वर्याने काम करण्यास नकार दिल्याची चर्चा आहे.
ऐश्वर्या आणि इम्रानमध्ये सुरु असलेल्या कोल्डवॉरमुळेच अँशने काम करण्यास नाही म्हटल्याचं समजतंय.