मुंबई : ए दिल है मुश्कील या चित्रपटाचं प्रमोशन करण्यामध्ये अभिनेता रणबीर कपूर बिझी आहे. रणबीर जोरदार प्रमोशन करत असला तरी या चित्रपटातल्या दोन्ही प्रमुख अभिनेत्री असलेल्या ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मा मात्र प्रमोशनच्या ठिकाणी दिसत नाहीत. ऐश्वर्या आणि अनुष्काच्या गैरहजेरीमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का शर्मा सध्या शाहरुखसोबत इम्तियाज अलीच्या चित्रपटाचं शूटिंग करत असल्यामुळे तिला ए दिल है मुश्कीलच्या प्रमोशनला जाता येत नाही. ए दिल है मुश्कीलमध्ये अनुष्काची मुख्य भूमिका आहे, तर ऐश्वर्याची भूमिका छोटी आहे. त्यामुळे अनुष्काऐवजी फक्त ऐश्वर्याच प्रमोशनला उपस्थित राहिली तर चुकीचा संदेश जाण्याची भीती दिग्दर्शक आणि निर्मात्यांना वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


अनुष्का आणि ऐश्वर्या एकत्र घेऊनच प्रमोशन करण्याचं निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनं ठरवल्याचंही बोललं जात आहे.