मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५०० आणि १००० ची नोट रद्द करण्याच्या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत होत आहे. काही राजकीय पक्ष याला विरोध करत असले तरी बॉलिवूड कलाकारांनी मात्र याचं स्वागत केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खान, शाहरूख खान, करण जोहर आणि अजय देवगन यांच्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चनने देखील या निर्णयाचं समर्थन केलं आहे.


अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने लोकांना संदेश देत म्हटलं की, त्यांनी याकडे मोठ्या दृष्टीकोनातून पाहावं. ऐश्वर्या अशा गोष्टींवर सहसा प्रतिक्रिया देत नाही.


एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटलं की, एक नागरिक असल्याने मी पंतप्रधानांना शुभेच्छा देते. तुम्ही खूप मजबूतपणे देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी पाऊलं उचलत आहात. एका देशाच्या रुपात आम्हाला ही गोष्ट विस्तृतपणे समजून घेण्याची गरज आहे. बदल सोपा नसतो. प्रत्येक जण कौतूक करेल जेव्हा हा निर्णय तो विस्तृतपणे समजून घेईल.