बुलगारिया: 'फूल ऑर कांटे'मध्ये बाईकवर स्टंट करून अजय देवगननं दिमाखात बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. यानंतर काही ठराविक ऍक्शन हिरोंच्या लिस्टमध्ये अजय देवगनचं नाव घेतलं गेलं. 
आजही अजय देवगन आपले स्टंट्स स्वत: करतो. आपल्या आगामी चित्रपट 'शिवाय'साठीही अजय स्वत: स्टंट करत आहे. या स्टंटवेळी अजय थोडक्यात बचावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलगारियाच्या सोफियामध्ये रस्त्यावर 'शिवाय'ची शूटिंग सुरु होती. यावेळी अजय गाडीच्या बोनेटवर होता. शूटिंगचा भाग म्हणून एकामागोमाग एक अशा अनेक गाड्या जोरात जात होत्या. 


चित्रपटाचं शूटिंग सुरु असल्यामुळे रस्त्यावरच्या गाड्यांनाही थांबवण्यात आलं होतं. पण अचानक एक गाडी आली आणि तिनं अजय देवगन ज्या बोनेटवर होता, त्या गाडीला टक्कर दिली. 


या अपघातामध्ये अजय देवगन थोडक्यात बचावला आहे. सुदैवानं त्याला कोणतीही इजा झालेली नाही. पण गाडीचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.