मुंबई : दबंग सलमान पाठोपाठ सिंघम अजयदेखील मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडलाय. अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'मुरांबा'ला अजयनं शुभेच्छा दिल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडची मराठी चित्रपटसृष्टीशी असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. आपल्या व्यग्र वेळापत्रातून वेळ काढत हे स्टार्स मराठी चित्रपटांची नेहमीच दखल घेताना दिसतात... प्रियांका चोप्रा, सलमान खान यांच्याबरोबरीने आता अजय देवगण देखील मराठी चित्रपटांमध्ये रस घेताना दिसत आहे. नुकतेच त्याने ‘मुरांबा’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करून नावाप्रमाणेच हा चित्रपटदेखील गोड आहे अशा अर्थाचे ट्विट करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. 


त्यामुळे येत्या काळात अजय देवगणने ‘विटी दांडू’ प्रमाणेच अजून एखाद्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली अथवा मराठी चित्रपटात भूमिका केली तर आश्चर्य वाटायला नको!