अक्षय कुमारची प्रियदर्शनबरोबर नवी इनिंग
अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन या जोडीगोळीनं अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
मुंबई: अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन या जोडीगोळीनं अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा ही हीट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी हा चित्रपट प्रोड्युस करणार आहे. अक्षय कुमारनं 6 वर्षांपूर्वी म्हणजेच 2010मध्ये प्रियदर्शन यांच्या खट्टामिठा या चित्रपटामध्ये काम केलं होतं.
या चित्रपटाचं नाव अजून ठरलं नसलं तरी हा चित्रपट कॉमेडी असणार आहे. या चित्रपटाची स्क्रीप्ट पूर्ण झाली असून, जुलै महिन्याच्या शेवटी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल, अशी माहिती प्रियदर्शन यांनी दिली आहे. चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असला तरी इतर अभिनेत्यांची निवड मात्र अजूनही झालेली नाही, असंही प्रियदर्शन म्हणाले आहेत.
दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांनी याआधी हेरा-फेरी, गरम मसाला, भागमभाग, भुलभुलैया आणि दे दणादण या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.