आलिया भट्टने सांगितलं, कोणाशी करणार लग्न
आलिया भट्ट तिच्या आगामी `बद्रीनाथ की दुल्हनिया` सिनेमामुळे चर्चेत आहे. आलियाने बद्रीनाथ की दुल्हनिया या सिनेमात मजेशीर भूमिका केली आहे. या सिनेमात ती वधू बनणार आहे. तिने नुकताच तिला कसा वधू हवा आहे याबाबत म्हटलं आहे.
मुंबई : आलिया भट्ट तिच्या आगामी 'बद्रीनाथ की दुल्हनिया' सिनेमामुळे चर्चेत आहे. आलियाने बद्रीनाथ की दुल्हनिया या सिनेमात मजेशीर भूमिका केली आहे. या सिनेमात ती वधू बनणार आहे. तिने नुकताच तिला कसा वधू हवा आहे याबाबत म्हटलं आहे.
आलियाने म्हटलं की, तिचा लाइफ पार्टनर एक मित्र असावा. माझा आणि माझा लाइफ पार्टनरमध्ये मैत्रीचं नातं असलं पाहिजे. आमचे विचार एकमेकांशी मिळाले पाहिजे. मला माझा कामावर खूप प्रेम आहे. लग्नानंतर किंवा मुले झाल्यानंतर मला सिनेसृष्टीतून बाहेर नाही जायचं आहे. त्यामुळे माझा लाईफ पार्टनरने माझं काम समजून घ्यावं.
आलिया म्हणते की, ती कधीही अॅरेंज मॅरेज नाही करणार. तिने म्हटलं की, तिचा लाईफ पार्टनर तिच्या विचारांसारखा असावा. पालकांना माहित नसतं की मुलाचे विचार कसे आहेत त्यामुळे मी माझा लाईफ पार्टनर स्वत: निवडणार आहे.