सलमानशी भिडायला तयार `अमिताभचा जावई`!
बॉलिवूडचा दबंग खान सध्या सुलतानसाठी जय्यत तयारी करतोय. सध्या, सलमानचं पिळदार शरीर पाहिलंत की तुम्हाला याची खात्री पटेल... पण, याच सलमानला टक्कर देण्यासाठी `अमिताभचा जावई`ही तयार होतोय.
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सध्या सुलतानसाठी जय्यत तयारी करतोय. सध्या, सलमानचं पिळदार शरीर पाहिलंत की तुम्हाला याची खात्री पटेल... पण, याच सलमानला टक्कर देण्यासाठी 'अमिताभचा जावई'ही तयार होतोय.
आता तुम्ही म्हणाल कोण अमिताभचा जावई... तर तो आहे 'रंग दे बसंती' मधून प्रेक्षकांच्या समोर आलेला अभिनेता कुणाल कपूर...
कुणालचे सिनेमे एकानंतर एक आपटलेत. त्याला 'फ्लॉप हिरो'चा टॅगही लागलाय. परंतु, सलमानच्या 'सुलतान' या सिनेमात कुणाल कपूरला महत्त्वाची भूमिका मिळालीय.
कुणाल कपूरनं नुकतंच आपली प्रेयसी आणि अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चन हिच्याशी विवाह केलाय. नैना ही अमिताभ यांचा छोटा भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी आहे.
कुणाल 'सुलतान' या सिनेमात एका प्रसिद्ध कॉमिक कॅरेक्टर 'डोगा'ची भूमिका साकारणार आहे. यामध्ये त्यानं कुत्र्याच्या चेहऱ्याचं मास्क चेहऱ्यावर चढवलंय. कुणालची सध्याची बॉडी पाहून तो केवढा खतरनाक व्हिलन दिसू शकतो, याचा अंदाजा तुम्हाला आलाच असेल.