मुंबई : आमीर खान आणि अमिताभ बच्चन हे दोघं एकाच चित्रपटामध्ये काम करणार आहेत. थग असं या चित्रपटाचं नाव असून यशराज बॅनरचा हा चित्रपट आहे. याआधी हा चित्रपट हृतिक रोशनला ऑफर करण्यात आला होता, पण हृतिकनं नकार दिल्यामुळे आमीरची या चित्रपटासाठी वर्णी लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमीरबरोबर काम करत असल्याचा मला अभिमान असल्याचं बिग बी म्हणाले आहेत. याबरोबच या चित्रपटाचं नाव थग असेलच असं नाही, अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. 


या चित्रपटाबाबत यशराजकडून लवकरच घोषणा होणार असल्याचं बोललं जात आहे. पुढच्या वर्षी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.