मुंबई : करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल या सिनेमातील ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सबाबत अखेर बिग बी यांनी आपले मौन सोडलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता फिल्म फेस्टिव्हलदरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या अमिताभ यांनी यावेळी ऐश्वर्याचे कौतुक केले. सिनेमात ऐश्वर्याने घटस्फोटित महिला सबा खानची भूमिका साकारलीये जी आपल्या बॉयफ्रेंडला सांगते की, मैं किसी की जरूरत नहीं, ख्वाहिश बनना चाहती हूं'. सिनेमात ज्याप्रमाणे महिलांचे कॅरेक्टर स्ट्राँग दाखवले जातेय त्यानुसार देशात महिला प्रगतीच्या दिशेने जात असल्याचा इशारा आहे, असे ते म्हणाले.


या सिनेमाचा टीझर आल्यापासून बच्चन कुटुंबियांनी ऐश्वर्याच्या भूमिकेबाबत मौन बाळगले होते. तसेच सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेक दिवस बच्चन कुटुंबियांनी हा सिनेमा पाहिला नव्हता. ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सवर बच्चन कुटुंबीय नाराज असल्याचेही बोलले जात होते.