बधाई हो टायगर हुआ है!
महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढल्यामुळे महानायक अमिताभ बच्चन भलतेच खुष झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढल्यामुळे महानायक अमिताभ बच्चन भलतेच खुष झाले आहेत. बधाई हो टायगर हुआ है, असं म्हणत मिठाई वाटतानाचा एक व्हिडिओ वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी शेअर केला आहे.
महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी वनखात्याकडून अमिताभ बच्चन यांना व्याघ्र प्रकल्पांचे व्याघ्रदूत बनवण्यात आलं. यानंतर वाघ वाचवा या मोहिमेला अमिताभ बच्चन यांनी सुरुवात केली.