मुंबई: पनामा पेपर लिकमध्ये नाव आल्यामुळे अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर बनवण्याचा निर्णय थांबवण्यात आला आहे. केंद्र सरकारमधल्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिन्यामध्ये अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर बनवण्यात येणार होतं, पण त्यांना जोपर्यंत क्लिन चीट मिळत नाही तोपर्यंत त्यांना ब्रॅन्ड ऍम्बेसेडर बनवण्यात येणार नाही. 


पनामा पेपर लीकमध्ये माझ्या नावाचा गैरवापर करण्यात आला आणि या रिपोर्टमध्ये आलेल्या कोणत्याही गोष्टींबाबत मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली होती. 


टॅक्स चोरी केल्याचा आरोप करत पनामा पेपरमध्ये जगभरातल्या अनेक बड्या लोकांची नावं आली होती, यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनीही टॅक्स चोरी केल्याचा दावा पनामा पेपरमध्ये करण्यात आला आहे.