मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या एका वेगळ्या व्यक्तीमत्वासाठी देखील जाणल्या जातात. एक गायक म्हणून, मुलींच्या शिक्षण जागृतीसाठी 'न्यूयॉर्क फॅशन वीक'मध्ये रॅम्पवॉक अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांनी एक त्यांचं वेगळं स्थान समाजात निर्माण केलं आहे. पण आता लवकरच त्या एका नव्या अंदाजात दिसणार आहेत ते ही बॉलिवूडचे शहशांह अमिताभ बच्चन यांच्यासोबत. एका 'म्युझिक व्हिडीओ'मधून अमृता फडणवीस या झळकणार आहेत. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.
 
गिरगावमधील ओपेरा हाऊसमध्ये फिर से या गाण्याचं शूटिंग झालं. या गाण्याला त्यांनीच स्वर दिले आहेत. कोरिओग्राफर अहमद खान यांनी या गाण्यासाठी दिग्दर्शन केलं आहे. बिग बींनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.