लॉस एन्जेलिस : हॉलिवूड अभिनेत्री एन्जेलिना जोली आणि ब्रॅड पिट या जोडप्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या पतीचे दुसऱ्या एका अभिनेत्रीसोबत संबंध असल्याची शंका एन्जेलिनाला आहे. त्यामुळेच तिनं ब्रॅडला 'डीएनए' चाचणी करण्यास सांगितलंय. ब्रॅड हा अभिनेत्री मेलिसा एदरीज हिच्या मुलांचा जैविक पिता असल्याची शंका एन्जेलिनाला आहे. 


वेबसाईट 'एसशोबिज डॉट कॉम'नं दिलेल्या माहितीनुसार, मेलिसानं नुकतंच एका ऑस्ट्रेलियन टॉक शो मध्ये बोलताना अपत्य प्राप्तीसाठी आपण ब्रॅट पिटकडून शुक्राणु मागण्याविषयी विचार करत होतो, असं म्हटलं होतं. 


परंतु, आपली मुलं बेली आणि बेकेटला जन्म देण्यासाठी गायक डेव्हिड क्रॉसबीच्या शुक्राणुंचा वापर केला, असंही मेलिसानं स्पष्ट केलं.


पण, एन्जेलिनाचा मात्र यावर विश्वास नाही. आपली शंका संपुष्टात आणण्यासाठी तिनं ब्रॅड पिटला डीएनए चाचणी करण्यास सांगितलंय. परंतु, पिटला मात्र हा मानसिक विकार असल्याचं सांगतोय, असं वेबसाईटनं म्हटलंय. 


पिटनं डीएनए चाचणी करण्यास नकार दिला तर आपण सरळ जाऊन मेलिसाला याचा जाब विचारु, अशी धमकीही एन्जेलिनानं ब्रॅडला दिलीय.