मुंबई : टीव्ही सीरियल 'भाभीजी घर पर हैं' मधील शिल्पा शिंदेची टीव्ही स्क्रीनवरुन नेहमीचीच गायब होण्याची शक्यता आहे. शिल्पा शिंदेवर सिने अॅड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन लाइफ टाइम बॅन लावण्याच्या विचारात आहे. शो मध्येच सोडल्याचा तिच्यावर आरोप आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार CINTAA ने जर लाइफ टाइम बॅन लावला तर तिला कपिल शर्माच्या शोमधून ही बाहेर पडावं लागू शकतं. शिल्पा विरोधात एक नॉन-को-ऑपरेशन ऑर्डर काढण्याचा देखील निर्णय झाला आहे. यानंतर कोणताच प्रोड्युसर शिल्पासोबत काम करु शकणार नाही. 


शिल्पाने चॅनलवर त्रास देत असल्याचा आरोप लावलाय. मेडिकल अनफिट असल्यामुळे तिने हा शो सोडल्याचं म्हटलं आहे. तर या शोच्या प्रोड्युसरने हे आरोप फेटाळून लावले आहे.