अंकिता लोखंडे ब्रेकअपवर बोलली...सुशांत असा आहे?
अभिनेता सुशांत सिंग आणि टीव्हीस्टार अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्या मीडियातून येत होत्या. मात्र, अंकिता लोखंडे हिने या अफवा असल्याचे म्हटले आहे. आमचे सहा वर्षांपासूनचे संबंध मजबूत असून तूटू शकत नाही, असे अंकिताने म्हटलेय.
नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंग आणि टीव्हीस्टार अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्या मीडियातून येत होत्या. मात्र, अंकिता लोखंडे हिने या अफवा असल्याचे म्हटले आहे. आमचे सहा वर्षांपासूनचे संबंध मजबूत असून तूटू शकत नाही, असे अंकिताने म्हटलेय.
मी सुशांत बरोबर नेहमीच असेन. मी त्याच्याशी विना अट प्रेम करीत आहे. आमच्या ब्रेकअपच्या अफवा पसरल्या आहेत. त्या निराधार आहेत. मी सुशांतला मीडियात आलेल्या ब्रेकअपबद्दल बातमी दिली, त्यावेळी त्यालाही धक्का बसला, असे अंकिताने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखतीत म्हटलेय.
सुशांतबद्दल ती म्हणाली, मी थोडीशी हळवी आहे. मी त्याच्याबद्दल पझेसिव्ह आहे. त्याच्यावर हक्क आहे. त्याच्यावर मी मनापासून प्रेम करते, त्यामुळे मला तो अधिकार आहे. तशी फिलिंग येतात. तसेच परिणीती आणि कृती यांच्यासोबत त्याची जवळीक असल्याने मी कधी त्याला धमकी देत नाही. या सर्व अफवा आहेत.
यावेळी अंकिताना सुशांतचे कौतुक केले. मी सुशातच्या प्रमाणिकतेवर विश्वास ठवते. त्याचा सम्मान राखते. सुशांत माझ्यासोबत खोटे काम करणार नाही. त्याने नेहमी माझ्यावर प्रेम केलेय आणि तो नेहमी प्रेम करीत राहील.