पटियाला : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या शाही साखरपुड्याची तयारी सुरु होती. अखेर रविवारी हा सोहळा पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिलौरी या हिंदी चित्रपटातील अनुष्काच्या साखरपुड्याचा शाही सोहळा पंजाबच्या पटियाला शहरातील एका हॉटेलच्या गेस्टरुममध्ये पार पडला. यावेळी अनुष्काने गोल्डन रंगाचा लेहंगा घातला होता. 


रविवारी शूट झालेल्या सीनमध्ये अनुष्काने अभिनेता सुरज शर्माला अंगठी घातली. गोल्डन लेहंगाच्या पेहरावात अनुष्काचा लूक रॉयल दिसत होता. 


सूत्रांच्या माहितीनुसार पुढील दोन-तीन दिवसांत अनुष्का आणि सूरज यांच्या लग्नाचा सीनही शूट केला जाणार आहे. 


या चित्रपटात अनुष्कासह पंजाबी स्टार दिलजीत दोसांज आणि लाईफ ऑफ पायचा स्टार सुरज शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. 


डार्क थ्रिलर फिल्म NH10 या चित्रपटानंतर फिल्लौरी अनुष्काचा दुसरा होम प्रॉडक्शन चित्रपट आहे.