मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानला राग आलाय. किंग खान किंवा आमिर खानवर तो रागावलेला नाही. चक्क सर्वांचा लाडका अरजित सिंगवर तो संतापलाय. सलमान खानचा नकळत झालेल्या अपमानाची अरजित माफी मागतोय.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरजित सिंगने पत्र पाठवून, फोन आणि मेसेजेस करुन माफी मागितली. तरीही सलमानचा राग कमी झालेला नाही म्हणून अरजितने नीता अंबानीच्या पार्टीत जाऊन देखील सलमानची माफी मागितली. एवढेच नव्हे तर अरिजित सिंगने सगळ्यांनसमोर फेसबुकवरून सुद्धा सलमान खानची माफी मागितली.

सलमानने झालेल्या अपमानामुळे अरजित सिंगने सुल्तानमधील गायलेले गाणे काढून ते दुसऱ्या गायकाकडून रेकॉर्ड करायचे ठरविले. मात्र तुझ्या फिल्मचे एक तरी गाणे माझ्या आवाजात असावे, अशी माझी ईच्छा आहे असे अरजितने सलमानला विनंती केली. बघू सलमान यावर आता काय प्रतिक्रिया देतो ते?