मुंबई : आजवर अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २७ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविणारा 'अस्तु' हा चित्रपट १५ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संस्कृत स्कॉलर असलेल्या चक्रपाणी शास्त्री यांना उतारवयात स्मृतीभंश (अल्झायमर) चा विकार होतो. वर्तमानाचा हात सोडून ते दुसर्‍याच गोष्टीत रमू लागतात. त्यातून मग सुरु होते ती, त्या व्यक्तीचा सांभाळ करणार्‍या कुटुंबाची कुचंबणा... अशी काहीसं या सिनेमाचं कथानक... 


वडील आणि मुलीचे असणारे अनोखे नाते हे या चित्रपटात उत्तमरित्या मांडण्यात आले आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे,  अभिनेत्री अमृता सुभाष, इरावती हर्षे, देविका दफ्तरदार आणि मिलिंद सोमण आदी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 


अस्तु

चित्रपटाचं लेखन सुमित्रा भावे व दिग्दर्शन सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांनी केलं असून, संगीत दिग्दर्शन धनंजय खरवंदिकर व साकेत कानेटकर यांनी केलं आहे.


यापूर्वी हा चित्रपट मर्यादित स्वरुपात प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, आता व्यापक पद्धतीनं ही कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यासाठी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असून प्रेक्षकांनाही हा चित्रपट  म्हटलंय.