अभिनेता कुणाल खेमूवर हल्ला
उत्तर प्रदेशची राजधानी कुणाल खेमूवर हल्ला झाल्याची घटना घडलीये. कुणाल आगामी सांवरे या चित्रपटाच्या व्हिडीओ शूटिंगसाठी लखनऊमध्ये गेला होता. त्यावेळी शनिवारी रात्री एका समूहाने या शूटिंगला विरोध केला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. यात कुणालच्या हाताला दुखापत झालीये.
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी कुणाल खेमूवर हल्ला झाल्याची घटना घडलीये. कुणाल आगामी सांवरे या चित्रपटाच्या व्हिडीओ शूटिंगसाठी लखनऊमध्ये गेला होता. त्यावेळी शनिवारी रात्री एका समूहाने या शूटिंगला विरोध केला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. यात कुणालच्या हाताला दुखापत झालीये.
मिळालेल्या माहितीनुसार, सांवरे या चित्रपटाच्या शूटिंगला काही लोकांचा विरोध होता. या चित्रपटातील एका गाण्याला पाकिस्तानी सिंगर राहत फतेह अली खानचा आवाज आहे. या रेकॉर्डिंगसाठी राहत तेथे उपस्थित होता.
अल्बमचे प्रोड्युसर निखिल द्विवेदींनी दिलेल्या माहितीनुसार, शूटिंगसाठी आम्ही परवानगी मागितली होती. मात्र परवानगी दिली नव्हती. त्यानंतरही आम्ही शूटिंग करत होतो.