मुंबई : 'अजहर' हा सिनेमा माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन याची प्रतिमा उजळ करण्यासाठी 'बायोपिक' म्हणून तयार करून प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा साफ आदळला... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

का घडलं असावं हे? हा प्रश्न हा सिनेमा पाहणाऱ्यांना पडणार नाही. कारण, या सिनेमात दाखवण्यात आलेल्या घटना आणि सत्य यांमध्ये बरीच तफावत आढळते.


१. फिक्स झालेल्या मॅचचा उल्लेखच गायब


अजहरवर तीन मॅच फिक्स करण्याचा आरोप होता. 


पहिली मॅच - टायटन कप, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (राजकोट - १९९६)... यामध्ये अजहरनं ९ रन केले आणि टीम इंडियाला ५ विकेटसनं पराभूत व्हावं लागलं.


दुसरी मॅच - आशिया कप, भारत विरुद्ध श्रीलंका (कोलंबो - १९९७)... यामध्ये अजहरनं ८१ रन्स केले होते... आणि भारतानं ८ विकेटनं ही मॅच गमावली होती. 


तिसरी मॅच - पेप्सी कप, भारत विरुद्ध पाकिस्तान (जयपूर - १९९९)... यात अजहर एक रन बनवून तंबूत परतला होता आणि हीदेखील मॅच भारतानं १४३ रन्सनं गमावली होती. 


सिनेमात मात्र या तीन मॅचपैंकी एकाही मॅचचा उल्लेख आलेला नाही. 


२. चैनीचं आयुष्य 


मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अजहर चुकीच्या पद्धतीनं अडकला असं सिनेमात दाखवण्यात आलंय. पण, कॅप्टन बनल्यानंतर अजहरचं चैनीचं आयुष्य दाखवण्यात मात्र टाळलं गेलंय. 


३. सर्वात महागडा घटस्फोट


संगीता बिजलानीसोबत लग्न करण्यासाठी अजहरनं त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. यासाठी, नौरीनला एक करोड रुपये त्यानं पोटगीदाखल दिले होते. हा त्यावेळचा देशातील सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता. याचा तर सिनेमात उल्लेखदेखील नाही. 


४. का रडला कपिल देव?


सिनेमात दाखवल्याप्रमाणे, कपिल देवनं अजहरला भेटण्यासाठी नकार दिला... आणि दशकभरानंतर त्याला उपरती झाली आणि त्यानं आपली चूक मान्य केली असं दाखवलं गेलंय. परंतु, कपिल देव बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत का रडला होता, हे मात्र यामध्ये दाखवण्यात आलेलं नाही. 


५. नौरीन संगीतासोबत कोर्टात आली होती?


खरंच नौरीन कोर्टात आली होती का? असादेखील प्रश्न पडतो... तेही संगीता बिजलानीला घेऊन... कारण नौरीन तर तेव्हा कॅनडामध्ये राहणाऱ्या एका भारतीय व्यापाऱ्यासोबत लग्न करून तिथंच स्थायिक झाली होती. 


६. संगीता - अजहरची जाहिरात शोधू नकार


संगीता बिजलानी आणि अजरुद्दीननं कोणती जाहिरात एकत्र केली होती? यूट्यूबवर शोधू नका... कारण अशी कोणतीच जाहिरात नव्हती.  


७. बुकीचं नाव का बदललं?


सिनेमात बुकीचं नाव एम के शर्मा दाखवण्यात आलंय... परंतु, खऱ्या बुकीचं नाव होतं एम के गुप्ता... जर हा बायोपिक होता तर या प्रकरणाशी संबंधित लोकांची नाव का बदलण्यात आली? हे काही कुणाला कळलेलं नाही.