नवी दिल्ली : भारतीय प्रेक्षक ज्या सिनेमाची मोठ्य़ा आतूरतेनं आणि उत्सुकतेनं वाट पाहत आहेत तो 'बाहुबली २' हा सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल झालाय. परंतु, हा सिनेमा भारताअगोदर परदेशात प्रदर्शित झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२८ एप्रिल रोजी बाहुबली संपूर्ण भारतभर प्रदर्शित करण्यात आलाय. तब्बल दोन वर्षानंतर प्रेक्षकांना 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' या त्यांना कोड्यात टाकणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. शिवाय, तांत्रिकदृष्ट्याही हा सिनेमा प्रेक्षकांना भावतोय. 


परंतु, हा सिनेमा भारतात प्रदर्शित होण्याअगोदर यूएईमध्ये प्रदर्शित झाला. यूएईमध्ये या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. त्यामुळे, भारताअगोदरच परदेशातूनच 'बाहुबली २'चा सिनेरिव्ह्यूही आलाय. 


यूएईचे सिने समीक्षक उमैर संधु यांनी 'बाहुबली २' या सिनेमाचा शॉर्ट रिव्ह्यू आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केलाय. उमैर यांनी या सिनेमाला ५ पैंकी ५ स्टार दिलेत. या सिनेमाचं तोंडभरून कौतुक त्यांनी केलंय. 


दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत त्यांनी 'बाहुबली २' मी पाहिलेल्या भारतीय सिनेमांपैंकी सर्वश्रेष्ठ सिनेमा असल्याचं म्हटलंय. शिवाय, सेन्सॉर बोर्डाचंही स्टँन्डींग ओव्हेशन या सिनेमाला मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय.