मुंबई :  बाहुबली २ : द कन्क्लूजन याने कमाईचा कोणताही रेकॉर्ड बनविला नसल्याचे मत चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी म्हटले आह. त्यांचा मुलगा उत्कर्ष याचा पहिला चित्रपट जीनियसच्या मुहूर्तावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गदर :  एक प्रेम कथा' सह अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या अनिल शर्मा यांना बाहुबली २ ने १००० कोटी रुपये कमविले, याबाबत प्रश्न विचारले असता, ते म्हणाले, वक्त वक्त की बात है... गदर हा २००१ मध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी त्याने २६५ कोटी रुपये कमविले होते. ते आजच्या ५००० कोटीच्या बरोबर आहे. 


ते म्हणाले, काही चांगले चित्रपट आले तर रेकॉर्ड तुटतात. पण बाहुबली २ चा प्रश्न आहे, या चित्रपटाने कोणताही रेकॉर्ड तोडलेला नाही. 


शर्मा म्हणाले, गदर जेव्हा रिलीज झाली तेव्हा २००१ मध्ये तिकीटाचे दर २५ रुपये होते. आज तिकीटाचे दर पाहा किती आहे. २५ रुपये तिकीटाचे दर असताना २६५ कोटी रुपये कमविले हा खूप मोठा विक्रम होता. त्यामुळे आजच्या आधारे ही रक्कम ५००० कोटींच्या आसपास आहे. बाहुबलीने १५०० कोटी कमविले आहे. त्यामुळे त्याने अजून कोणताही विक्रम तोडलेला नाही...