मुंबई :  गेल्या अनेक दिवसापासून बहुप्रतिक्षित बाहुबली - द कनक्युजन हा चित्रपट आज रिलीज झाला. रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाने ४४४ कोटी रुपयांच कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेच सुमारे ४४४ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा आतापर्यंतचा विक्रम मानला जात आहे. गेल्या २४ तासात एकूण १० लाख तिकीटांची विक्री झाली आहे. 


आज तिकीट खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी एक तिकीट २००० ते २४०० रुपयांनी ब्लॅकने विकले गेले. 


एकूण ९००० थिएटरमध्ये एक चित्रपट झळकण्याची ही पहिली वेळ आहे.  त्यामुळे हा चित्रपट १००० कोटींचा टप्पा गाठेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. 


या चित्रपटासाठी जगभरातील ३३ स्टुडिओने मिळून व्हिज्युअल इफ्केट काम केले.