मुंबई : बाहुबली-2 म्हणजेच बाहुबली द कनक्ल्युजन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोजच वेगवेगळे रेकॉर्ड करताना दिसत आहे. या चित्रपटानं 25 दिवसांमध्ये 1600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बाहुबली चित्रपटगृहांमध्ये असाच कायम राहिला तर लवकरच 2000 कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमात प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, राम्या, कृष्णनन आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.