मुंबई: संजय लीला भन्सालींच्या 'बाजीराव मस्तानी'नं बॉक्स ऑफीसवर अनेक रेकॉर्ड केले. या रेकॉर्डमध्ये आता आणखी एक भर पडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजीराव मस्तानी रिलीज होऊन 50 दिवस झालेत, आणि आजही थिएटरमध्ये बाजीराव मस्तानीचे शो सुरु आहेत. प्रेक्षकही 50 दिवसानंतरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत आहेत. 


'बाजीराव मस्तानी'च्या रिलीजला 50 दिवस झाल्यामुळे चित्रपटात बाजीरावची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगनं ट्विट केलं आहे. 50 दिवसानंतरही 'बाजीराव मस्तानी' जोरात याचा फोटो रणवीरनं ट्विट केला आहे.  


या चित्रपटानं बॉक्स ऑफीसवर आत्तापर्यंत 350 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी बाजीराव मस्तानी एक आहे. 


बाजीराव मस्तानीला यंदाच्या फिल्मफेअर अवॉर्डमध्येही तब्बल 12 नॉमिनेशन्स मिळाली होती, त्यापैकी 9 अवॉर्ड या चित्रपटाला मिळाली, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- संजय लीला भन्साली, सर्वोत्कृष्ट अभिनेता-रणवीर आणि सर्वोतकृष्ट सहाय्यक अभिनेत्री-प्रियांका चोप्रा यांचा समावेश होता.