मुंबई : या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर तीन हिंदी तर दोन मराठी सिनेमे प्रदर्शित झालेत रवी जाधवचा दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमधील पहिला सिनेमा 'बॅंजो ' आज प्रदर्शित झालाये. सिनेमात रितेश देशमुख आणि नर्गिस यांची प्रमुख भूमिका आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस तळपदेची प्रमुख भूमिका असलेला 'वाह ताज' हा सिनेमाही आज प्रदर्शित झालाये. सिनेमाची कथा रंजक असून सिनेमाकडून श्रेयसला प्रचंड अपेक्षा आहेत. रितेश आणि श्रेयसची चांगली मैत्री असून दोन मित्रांचे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यामुळे सगळ्यांनीच भुवया उंचावल्या आहेत . 


तसेच राधिका आपटेची प्रमुख भूमिका असलेला 'पार्च्ड' हा सिनेमाही प्रदर्शित झालाये तर दुसरीकडे अमृता खानविलकर, सचित पाटील, शशांक केतकर, नेहा महाजन आणि गश्मिर महाजनी अशी भलीमोठी स्टारकास्ट असलेला बिग बजेट 'वन वे तिकीट' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.


या बरोबरचं मराठीतील हॉट बेब स्मिता गोंदकर आणि क्राईम पेट्रोल या मालिकेमूळे घराघरात पोहोचलेले अभिनेते राजेंद्र शिरसाटकर अशी  हटके जोडी असलेला ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ हा सिनेमाही प्रदर्शित झालाये. त्यामुळे यामध्ये कोणता सिनेमा बाजी मारणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.