मुंबई: रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या बेफिक्रेचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. पहिल्या पोस्टरप्रमाणेच या पोस्टरमध्येही रणवीर आणि वाणी एकमेकांना किस करत आहेत. रणवीर आणि वाणी सध्या पॅरिसमध्ये बेफिक्रेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. वाणीनं हे पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे.



रणवीर आणि वाणी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. आदित्य चोप्रा आठ वर्षानंतर पुन्हा एकदा या चित्रपटातून दिग्दर्शनामध्ये कमबॅक करतो आहे. बेफिक्रे 9 डिसेंबरला रिलीज होणार आहे.