मुंबई : अभिनेत्री रति अग्निहोत्री हिच्या वरळी येथील इमारतीत इलेक्ट्रीसिटी मीटरमध्ये छेडछाड करण्यात आल्याचं समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाईटबील कमी करण्यासाठी लाईटच्या मीटरमध्ये छेडछाड केल्याचं यातून उघड होतंय. बेस्टच्या व्हिजिलन्स टीमने आज वरळी सीफेज येथील स्टर्लिंग सी फेज बिल्डिंग येथे धाड टाकली. यावेळी इमारतीतील फ्लॅट नंबर १३०३ च्या इलेक्ट्रीक मीटरमध्ये मागून छिद्र पाडून रीडिंग कमी करण्यासाठी तार टाकण्यात आली असल्याचं निदर्शनास आलं. हा मीटर रती अनिल अग्निहोत्री यांच्या नावावर होता.


या प्रकरणी आता बेस्टचे अधिकारी पंचनामा करत असून, कारवाईचा भाग म्हणून जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. इंडियन इलेक्ट्रीसिटी अॅक्ट २००३ नुसार आता एफआयआर दाखल केली जाणार आहे... आणि पुढे पोलीस तपास झाल्यानंतर न्यायालयात खटला सुरु होईल...


रती अग्निहोत्री यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर त्यांना तीन वर्षे सक्त कारवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.