मुंबई : भाभीजी घर पर है, या टीव्ही मालिकेची अभिनेत्री शिल्पा शिंदेने ही मालिका आता सोडली आहे. यावेळी शिल्पाने टीव्ही चॅनेलवर अनेक आरोप केले आहेत. अभिनेत्री सौम्या टंडनला झुकतं माप दिल्याचा आरोप शिल्पाने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाभीजी घर पे है या मालिकेला सर्वात जास्त टीआरपी असताना शिल्पा शिंदेने या मालिकेचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिल्पाची अंगुरी देवीची भूमिका आता रश्मी देसाई साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


सौम्या टंडनला मालिकेच्या निर्मात्याकडून कायम झुकतं माप दिलं गेल्याचा आरोप शिल्पाने केला आहे.