मुंबई- बॉलीवूडमधील हॉट जोडी करणसिंग ग्रोवर आणि बिपाशा बसू ३० एप्रिलला लग्नाच्या बंधनात अडकले. हा दिमाखदार सोहळा मुंबईतल्या एका अलिशान हॉटेलमध्ये पार पडला. पंजाबी आणि बंगाली पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेसृष्टीतल्या अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिनेता सलमान खान, सोनम कपूर यांसह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.


लग्नाच्या फोटोशूटदरम्यान मीडियाने बिपाशाला हनिमूनविषयी प्रश्न विचारला तेव्हा तिने हसत हसत उत्तर देताना आपण सलमानला सोबत घेऊन जाणार असल्याचे सांगितले. तिच्या या वाक्यावर मात्र उपस्थितांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या.


नंतर नेहमीप्रमाणे सलमान खानला लग्नाविषयी विचारले तर बिपाशा म्हणाली, 'मी सलमानची मैत्रिण आहे, मला सलमानच लग्न व्हाव असं वाटत नाही. जगभरातल्या मुलींशी तो चांगला वागतो. त्याने लग्न करावं किंवा करु नये, त्याने नेहमी आनंदी रहाव.


बिपाशाच्या आधी करण ग्रोवरने दोन लग्न केली होती पण दोन्हीवेळेस त्याचा घटस्फोट झाला, त्याची पहिल लग्न फक्त दहा महिने टिकलं आणि दुसरी पत्नी जेनिफर विगेंट बरोबर तो चार वर्ष एकत्र होता.