मुंबई : अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज जयंती आहे. निखळ सौंदर्याची खाण होत्या स्मिता पाटील. त्यांची चित्रपटातील कारकीर्द केवळ 10 वर्षांची राहिली मात्र आजही त्या चाहत्यांच्या आठवणीत आहेत. स्मिता पाटील केवळ चित्रपटातील अभिनयासाठीच नाही तर अभिनेता राज बब्बर यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणामुळेही चर्चेत राहिल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले. स्मिता पाटील यांचे भूमिका, मंथन, मिर्च मसाला, मंडी, नमक हलाल, शक्ती सारखे सिनेमे गाजले. हिंदी आणि मराठी या दोन्हींमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला. 


स्मिता पाटील यांचे लग्न चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले होते. 1985मध्ये जेव्हा स्मिता पाटील यांच्याशी लग्न करण्याबाबत राज यांनी त्यांच्या घरात विषय काढला तेव्हा राज यांना चांगलाच विरोध झाला. घर अथवा स्मिता पाटील याच्यापैकी एकाची निवड कऱण्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात आला.


त्यावेळी राज बब्बर विवाहित होते. त्यांचा नादिया बब्बर यांच्याशी विवाह झाला होता. राज आणि नादिया यांची दोन मुलेही आहेत. पण राज यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घर सोडल्यानंतर 1986मध्ये स्मिता पाटीलशी लग्न केले. 


मात्र मुलगा प्रतीकच्या जन्मानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला. स्मिता यांना ताप आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काही तासांतच त्या कोमात गेल्या. 13 डिसेंबर 1986मध्ये प्रतीकचा जन्म झाल्यानंतर सहा तासांत त्यांचा मृत्यू झाला.