मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी बीएमसीचे कर्मतारी लागले आहेत. पण यादरम्यान एक अशी चूक झाली ज्यामुळे एका अभिनेत्रीला अडचणींचा सामना करावा लागतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री अवनी मोदीचा मोबाईल नंबर बीएमसीने चुकून शेअर केला. यानंतर निवडणूक ओळखपत्रातील चूक सुधारण्यासाठी या अभिनेत्रीला फोन आणि मॅसेज येऊ लागले.


एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार बीएमसीकडून एक जाहिरात केली गेली ज्यामध्ये मतदान ओळखपत्रात चुका दुरुस्तीसाठी एक नंबर दिला गेला होता. या नंबरवर कॉल करुन मतदार त्यांच्या तक्रारी करु शकणार होता. पण या जाहिरातीत चुकून अभिनेत्री अवनी मोदीचा नंबर छापला गेल्याने हजारो फोन, मिस कॉल आणि मॅसेज तिला येऊ लागले. यामुळे तिला त्रास होत असल्याचं तिने म्हटलं आहे.


या प्रकरणात दोषी अधिकाऱ्याने माझी माफी मागावी असं अवनीने म्हटलं आहे. तर आयुक्तांनी एक दुसरी जाहिरात जाहीर करत चूक सुधरवली आहे. आणि माफीचं एक लेटर अवनी मोदीला देखील पाठवण्यात आल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे.