नवी दिल्ली : बॉबी देओलचा गुप्त हा चित्रपट रिलीज होऊन 19 वर्ष झाली आहेत. गुप्त चित्रपटाच्या 19 वर्षानंतर बॉबी देओल आणि गुप्त सोशल नेटवर्किंगवर पुन्हा एकदा पण चुकीच्या कारणांमुळे ट्रेन्डिंगमध्ये आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या महिन्यात दिल्लीतल्या एका क्लबमध्ये बॉबी देओलनं डीजे वाजवला. बॉबी देओलचा हा डीजे क्लबमध्ये आलेल्या प्रेक्षकांना मात्र रुचला नाही. क्लबमधले प्रेक्षक बॉबीच्या डीजेमुळे चांगलेच भडकले आणि त्यांनी क्लबच्या मालकाकडे पैसे परत मागितले. इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकलनं ही बातमी दिली आहे. 


प्रेक्षकांनी या क्लबमध्ये येण्यासाठी अडीच हजार ते चार हजार रुपये भरले होते. प्रेक्षक जेव्हा भडकले होते, तेव्हा मात्र बॉबी देओल क्लबमधून निघून गेला होता. या डीजेमध्ये बॉबी देओलनं त्याच्याच गुप्त चित्रपटातली गाणी वाजवली असल्याचंही बोललं जात आहे.