मुंबई :  अभिनेता ओम पुरी यांचे अचानक निधन झाल्याने चित्रपट सृष्टीसह सर्व देश दुःखात आहे. कोणी विचार केला नाही की वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ही दुःखद वार्ता मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे म्हणतात की व्यक्तीला आपल्या मृत्यूचा आभास होतो. तर काय ओम पुरी यांना असा आभास झाला होता, कारण एका मुलाखतीत त्यांनी या संदर्भात चर्चा केली आणि म्हटले की त्यांना कोणत्याही प्रकारच्या मृत्यूची भीती वाटत नाही.  


काही दिवसापूर्वी बीबीसी हिंदीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही.  पण आजारी पडल्यावर त्यांना खूप भीती वाटते.  आजारी माणसाला लाचार पाहून खूप त्रास होतो. त्यांची जी परिस्थिती होते. त्याची भीती वाटते. 


या मुलाखतीत म्हटले होते की मृत्यू असा यायला पाहिजे की माहितीच पडायला नको की मृत्यू आला आहे. झोपेत मृत्यू आला पाहिजे आणि झोपेतच तुम्ही जगाचा निरोप घेतला पाहिजे. 


यावेळी त्यांनी म्हटले की तुम्हांला एखाद्या दिवशी कळेल की ओम पुरी यांचे ७ वाजून २२ मिनिटांनी निधन झाले. आता नियती पाहा की ओम पुरी यांचे निधन या कालावधीत कोणत्याही आजाराशिवाय झाले.