मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनावतचं वय किती आहे याबाबतचा खुलासा झाला आहे. कंगनाच्या पासपोर्टनुसार तिची जन्म तारीख ही १३ मार्च १९८६ आहे. म्हणजेच तिचं वय ३१ वर्ष आहे. पण कंगना स्वत:चं वय २९ वर्ष असल्याचं सांगते. अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.


एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कंगना रनावतचा आणखी एक खोटं बोलण्याचा प्रकार समोर आला आहे. कंगनाने कट्टी-बट्टी हा सिनेमा सलमानने सांगितल्यामुळे केल्याचं सांगितलं होतं पण जेव्हा सलमानला या बाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याने याबाबत कंगनासोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं होतं.