मुंबई : बॉलिवूचा शेहनशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन. पण, अमिताभला 'ऑल इंडिया रेडिओ'ने त्याच्या भारदस्त आवाजामुळेच नाकारलं होतं हे किती जणांना माहितीये? दक्षिणेचा थलायवा म्हणून प्रसिद्ध असणारा रजनीकांत आधी बस कंडक्टर होता. पण, आज सुपरस्टार झालेल्या या कलाकारांचा हा कष्टदायक भूतकाळ मात्र कधीच लोकांसमोर येत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये अशीच स्वप्नांची झोळी घेऊन त्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्यांच्या कथेवर दिग्दर्शक के डी सत्यम एक सिनेमा घेऊन येतायत 'बॉलिवूड डायरीज' या नावाचा. अभिनेत्री रायमा सेन यात प्रमुख भूमिकेत दिसेल. त्यात आशिष विद्यार्थी आणि सलीम दिवाण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. हा चित्रपट येत्या २६ फेब्रुवारीला प्रदर्शित होईल.