`बाहुबली २`ची प्रतिक्षा करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, शूटिंग सुरु
`बाहुबली द कॉनक्लूजन` म्हणजेच बाहुबली २ या सिनेमाची प्रतिक्षा करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. या सिनेमाची शूटिंग सुरु झाले आहे. या सिनेमातील मुख्य भूमिकेतील अभिनेत्यांने चार महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर शूटिंग सुरु झाले आहे.
मुंबई : 'बाहुबली द कॉनक्लूजन' म्हणजेच बाहुबली २ या सिनेमाची प्रतिक्षा करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. या सिनेमाची शूटिंग सुरु झाले आहे. या सिनेमातील मुख्य भूमिकेतील अभिनेत्यांने चार महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर शूटिंग सुरु झाले आहे.
बाहुबली २ या सिनेमासाठी या अभिनेत्याने चक्क १५० किलोग्रॅम वजन केलेय. मुख्य भूमिकेतील हिरोचे तीन मोठे कारनामे दाखविण्यात आलेत. डिसेंबर २०१५ मध्ये या सिनेमाचे सुरुवातीचे शूटिंग करण्यात आले आहे. त्यानंतर चार महिन्यांचे खडतर प्रशिक्षण देण्यात आले आणि आता पुन्हा शूटिंग सुरु झालेय.
प्रभासने तीन दृश्यांसाठी चार महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. निर्देशक एस. राजामौली आणि त्याची टीम एकदम आनंदी आहे. प्रभासने आपले वजन वाढविण्यासाठी रोज ५० अंडी, फळे, तीन तास व्यायाम आणि जास्तीची मेहनत घेतली.