मुंबई : एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली द कनक्लूजन हा सिनेमा अखेर आज प्रदर्शित झालाय. गेल्या कित्येक महिन्यांपासून चाहत्यांना पडलेल्या कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात जरी हा सिनेमा आज रिलीज झाला असला तरी काल यूएईमध्ये हा सिनेमा रिलीज झाला. यूएईच्या समीक्षकांनी तर या सिनेमाचे तोंडभरुन कौतुक केलेय. यूएईचे समीक्षक उमेर सिंधू यांनी बाहुबली हा मी पाहिलेला सर्वात बेस्ट सिनेमा असल्याचे त्यांनी म्हटलेय.