मुंबई : एम एस धोनी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या धमाकेदार यशानंतर 'बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल' दिशा पटनी सध्या सातवे आँसमानपर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायगर श्रॉफची गर्लफ्रेण्ड म्हणून सतत चर्चेत राहणारी दिशा हळूहळू स्वत:ची ब्रॅण्ड व्ह्ल्यूही निर्माण करतेय. बॉलिवूडची 'न्यू ग्लॅम डॉल' दिक्षा पटनीची एम एस धोनी या सिनेमातील कामाची सगळ्यांनीच दखल घेतली होती. तसेच टायगर श्रॉफबरोबर असलेल्या अफेअरनेही दीक्षा सतत चर्चेत राहते.


'दिशा पटनी अॅप'


आता तर दीक्षाने स्वत:चं अॅप लाँच केलं असून त्याद्वारे फॅन्सशी ती कनेक्ट राहू शकणार आहे. 'दिशा पटनी अॅप' असं या अॅपचं नाव असून याव्दारे दिक्षा तिच्या फॅन्सशी संवाद साधू शकणार आहे..या अॅपबद्दल दिक्षा प्रचंड एक्साईटेड असून तिची एक्साईटमेंट तिने शेअर केलीय. 


दिशाने जरी तिचे हे अॅप आता लाँच केलं असलं तरी ती आधीपासूनचं फॅन्सशी कनेक्टेड असते. सोशल साईट्सवर आपले हॉट आणि बिनधास्त फोटो टाकून दिशा सतत फॅन्सच्या चर्चेचा विषय ठरते. त्यामुळे दिशाचं फॅन फॉलोईंगही तगडं आहे. दिशालाही सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत राहण्यात काहीच गैर वाटत नाही.


दिशा-टायगरची हीट जोडी


दिशाने टाकलेल्या तिच्या डान्सच्या व्हिडिओलाही सोशल साईट्सवर लाखो हिट्स मिळाले होते. खरतरं दिशा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या आधीपासूनचं चर्चेत होती. बॉलिवूडचा फ्लाईंट जाट टायगर श्रॉफ बरोबर असलेल्या कथित अफेअरमुळे दिशा सातत्याने लाईम लाईटमध्ये राहायची. मग टायगर बरोबर डीनर डेट असो, लपून छपून मूव्ही डेट असो, अवॉर्ड फंक्शन असो की बर्थ डे पार्टी अगदी सगळीकडेच ही जोडी खुलेआमपणे दिसली...


'बेफिक्रे' या व्हिडिओ अल्बममध्ये या जोडीने स्क्रिन शेअर केली होती. या गाण्यातील या दोघांच्या सिझलिंग केमिस्ट्रीने सगळ्यांनाच घायाळ केलं होतं. टायगर आणि दिशाने जरी खुलेआमपणे प्रेमाची कबुली दिली नसली तरी इशाऱ्यामध्ये नकळत दिशाने टायगरचं तिचा पहेला पहेला प्यार असल्याचं कबूलं केलं आहे.


त्यामुळे लव्ह लाईफबरोबरचं प्रोफेशनल लाईफमध्येही दिशाचा बोलबाला आहे, असंच म्हणावं लागेल. सध्या दिशाचं करीयर चांगलचं रुळावर येतयं... त्यामुळे आगामी काळात दिशाकडून चांगल्या सिनेमांची अपेक्षा करायला हरकत नाही.