वॉशिंग्टन : बॉलीवूड क्वीन कंगना राणावतच्या कारच्या अमेरिकेत अपघात झालाय. या अपघातातून कंगना बचावली असली तरी तिच्या डोक्याला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, कंगनाच्या चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने गाडी कुंपणाला जाऊन आदळली. यावेळी कंगनासह आणखी काही जण गाडीत होते.


सिमरन या सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या कंगना व्यस्त आहे. अमेरिकेत हे शूटिंग होतंय. जॉर्जियाची राजधानी अटलांटापासून काही अंतरावर हे शूटिंग सुरुय. शूटिंगवरुन हॉटेलमध्ये परतता असताना हा अपघात झाली. गाडी चालवताना त्याचे स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.