जिया खान मृत्यू प्रकरणाची SIT चौकशीची मागणी हायकोर्टानं फेटाळली
जिया खानच्या मृत्यूप्रकरणी राबिया खान यांनी केलेली याचिका कोर्टानं फेटाळलीय.
मुंबई : जिया खानच्या मृत्यूप्रकरणी राबिया खान यांनी केलेली याचिका कोर्टानं फेटाळलीय.
जिया खान हिच्यासंदर्भात केलेल्या तपासानंतर जियानं आत्महत्या केल्याचं सीबीआयनं आरोपपत्रात म्हटलं होतं... पण त्याला आव्हान देत जियाची आत्महत्या नव्हे तर हत्या झाल्याचा दावा करत, या प्रकरणाची विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्यासाठी राबिया खान यांनी याचिका दाखल केली होती.
हायकोर्टानं ही याचिका फेटाळलीय. त्यामुळे जियाची आत्महत्या असल्याचं स्पष्ट झालंय. यानंतर, सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसारच विशेष सीबीआय कोर्टात आता खटला चालणार आहे.