मुंबई : अभिनेता अजय देवगणने आपल्या आगामी चित्रपटाच्या कास्टचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय. 'गोलमाल अगेन' या चित्रपटाच्या आगामी चित्रपटात परिणिती चोप्रा ही नवी सदस्य दिसून येतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहीत शेट्टीच्या ४३व्या वाढदिवसाच्या पार्टीला ही सगळी टीम हजर होती. त्यावेळी त्यांनी काढलेला हा फोटो अजयने शेअर केलाय.


त्या फोटोसोबत त्याने कॅप्शन टाकलंय,'वाढदिवस  मज्जा-मस्तीने भरपूर असायला हवेत , अगदी आमच्या गोलमाल फॅमिलीसारखे...'

गोलमाल अगेनमध्ये अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तलपदे, कुणाल खेमू यांच्यासोबतच परिणिती चोप्रा, तबू आणि निल नितिन मुकेश ही नवीन कास्ट दिसून येईल. 


काही दिवसांपूर्वी परिणितीने क्लिपिंग बोर्डाचा फोटो पोस्ट करून शुटींग सुरु झाल्याची माहिती दिली होती.


हा चित्रपट या दिवाळीत प्रदर्शित होईल. 'गोलमाल ३'नंतर सात वर्षांनी हा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 


पहिल्या भागांत रिमी सेन तर दुसऱ्या आणि तिसऱ्या भागांत करिना कपूर खानने मुख्य भूमिका निभावली होती. तर चौथ्या भागात परिणिती व तब्बू या भुमिका करतील.