मुंबई : कॉमेडी नाइट्सचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता कपिल शर्माबद्दल धर्मेंद्र यांनी कॉमेडी नाइट्समध्ये केलेल्या प्रशंसेला कलर्स टीव्हीने कात्री लावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्र कॉमेडी नाइट्स लाइव्हमध्ये आले होते. त्यांना माहित नाही की कॉमेडी नाइट्समधून कपिलचा पत्ता कट झाला आहे. 


त्यांनी एकदा नाही अनेक वेळा कपिलचा विषय काढला. त्याची प्रशंसा केली. मग येथे कलर्स टीव्हीचा आत्मसन्मान जागा झाला, त्यांनी कपिलच्या प्रशंसेला कात्री लावली. 


धर्मेंद्रजींना जेव्हा समजले की कपिल शोमधून बाहेर पडला. त्यानंतर धर्मेंद्र घरी गेले आणि त्यांनी कपिलला फोन लावला आणि त्याला आशीर्वाद दिले.