काळवीट शिकार प्रकरण : सलमानवर सोमवारी निकाल ?
जोधपूर काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालय बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या विरोधात सोमवारी निर्णय देवू शकते. सलमानने उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात याचिका दाखल केली होती.
जयपूर : जोधपूर काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालय बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या विरोधात सोमवारी निर्णय देवू शकते. सलमानने उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात याचिका दाखल केली होती.
सलमानला या दोन प्रकरणात एक वर्ष आणि पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. उच्च न्यायालयने या प्रकरणावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुनावणी पूर्ण केली होती पण निर्णय दिला नव्हता. उच्च न्यायालय जर खालच्या न्यायालयाच निर्णय कायम ठेवला तर सलमानला पुन्हा जोधपूरच्या कारागृहात जावं लागू शकतं. शिकार केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या प्रकरणात सलमानशिवाय आणखी 7 आरोपी देखील यात सहभागी आहेत. जोधपूरमधील सुदूरवर्तीमध्ये 26 सप्टेंबर 1998 ला आणि घोडा फार्म्समध्ये 28 सप्टेंबर,1998 अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी काळवीटची शिकार करण्यात आली होती.
सलमान त्यादरम्यान 'हम साथ साथ हैं' सिनेमाची शूटिंग करत होता. सलमान याआधी या प्रकरणात जोधपूर जेलमध्ये देखील जावून आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "सलमानची बहिण अलवीरा जोधपूरला पोहोचली आहे आणि सलमानचे वकील हस्तीमल सारस्वत यांची देखील भेट घेणार आहे.