मुंबई : अभिनेता आमिर खानच्या दंगल सिनेमाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुली गीता आणि बबिता यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा पाहण्यासाठी लोकांची थिएटरमध्ये मोठी गर्दी होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाने पहिल्या दिवसांत तब्बल २९.७८ कोटींचा जबरदस्त गल्ला जमवलाय. बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासून आमिरची दंगल सुरु झालीये. 


पहिल्या दिवसाचा हा आकडा पाहता पहिल्या तीन दिवसांतच हा सिनेमा १०० कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज विश्लेषक तरण आदर्श यांनी व्यक्त केलाय.


आमिरच्या दंगलला भारतातच नव्हे तर भारताबाहेरही मोठा प्रतिसाद मिळतोय. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूएसए या देशांमध्येही दंगल जबरदस्त हिट आहे.