`जिच्याशी लग्न केलं ती माझी पत्नी नाहीच...`
अभिनेता दीपक तिजोरी सध्या मोठ्या अडचणीत सापडलाय. पत्नी शिवानीसोबत झालेल्या भांडणानंतर त्याला घरातून बाहेर पडावं लागलंय... इतकंच नाही तर शिवानी हिच्याशी आपलं लग्न झालंय पण ती आपली पत्नी नाहीच, असा दावाही दीपक सध्या करतोय.
मुंबई : अभिनेता दीपक तिजोरी सध्या मोठ्या अडचणीत सापडलाय. पत्नी शिवानीसोबत झालेल्या भांडणानंतर त्याला घरातून बाहेर पडावं लागलंय... इतकंच नाही तर शिवानी हिच्याशी आपलं लग्न झालंय पण ती आपली पत्नी नाहीच, असा दावाही दीपक सध्या करतोय.
पत्नी शिवानी हिचा पहिला विवाह झाला होता... परंतु, तिनं आपल्या पतीसोबत कायदेशीर घटस्फोट घेतलाच नव्हता, असा दावा दीपकनं केलाय. त्यामुळे, दीपक-शिवानीच्या विवाहाला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही.
तिजोरीची पत्नी शिवानीनं त्याच्याविरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज देत पोटगीची मागणी केलीय. 20 वर्षांपूर्वी दीपक - शिवानीचा विवाह झाला होता. दीपकला एक 20 वर्षांची मुलगीही आहे... तिचं नाव समारा आहे.
'स्पॉटबॉय'नं दिलेल्या बातमीनुसार, शिवानीनं मुंबईतील गोरेगावात असलेल्या दीपकच्या घरावर ताबा मिळवलाय... ज्या घरातून दीपकला बाहेर काढण्यात आलंय. सध्या दीपकचं अॅक्टिंग करिअरही मावळतीकडे झुकलंय. दिग्दर्शक म्हणूनही तो फारसा प्रभाव टाकू शकलेला नाही.
तर, दुसरीकडे दीपकचं एका योगा इन्स्ट्रक्टरसोबत चाललेल्या अफेअरमुळे शिवानी नाराज असल्यांचं सांगण्यात येतंय. यामुळेच शिवानीनं घटस्फोटाचा अर्ज करत पोटगीची मागणी केलीय. परंतु, तिचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला नसेल तर दीपकसोबतचा विवाह बेकायदेशीर ठरतो... त्यामुळे दीपकनं तिला पोटगी देण्याचा प्रश्नच येत नाही, असं दीपकच्या एका मित्रानं 'स्पॉटबॉय'शी बोलताना म्हटलंय.